प्रजोत्पत्तीचा परवाना
अमेरिकेतील ‘सेंट्रल मिचिगन कॉलेज’ चे एक अधिकारी आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. ट्राउट म्हणतात की ‘आईबापांना प्रजोत्पत्तीकरता परवाना लागेल’ असा कायदा पुढेमागे झाल्याशिवाय राहणार नाही. अन्नाच्या दृष्टीने जगाची लोकसंख्या कमाल मर्यादेपर्यंत वाढली म्हणजे पुढे अशी खबरदारी घ्यावी लागेल की फक्त सुप्रजाजननाच्या दृष्टीने योग्य आईबापांसच मुले व्हावीं. अर्थात् विवाहाची परवानगी सर्वांना असावी, पण सर्वांनाच मुले होऊ द्यावी असा …